कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे. …
Read More »शहीद जवान सागर बन्ने यांच्या स्मारकाचे शुक्रवारी उद्घाटन
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील जवान सागर आप्पासाहेब बन्ने हे पंजाब (भटिंडा) येथे शहीद झाले. त्याला शुक्रवारी (ता.१२) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आप्पासाहेब बन्ने कुटुंबीयातर्फे येथील बिरदेव मंदिर परिसरात त्यांचे स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे लोकार्पण शुक्रवारी (ता.१२) होत आहे. शहीद जवान सागर बन्ने एक मेंढपाळ …
Read More »शहापूर, वडगाव भागात शिवजयंती उत्साहात साजरी करा : नेताजी जाधव
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक मंगळवार दिनांक ९/४/२०२४ रोजी श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव होते. ९ मे रोजी पारंपरिक शिवजयंती व ११ मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी मोठ्या उत्साहात हा शिवजयंती उत्सव …
Read More »वडिलांच्या मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मालकाकडून मुलीला मारहाण
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील काकती गावात एक घृणास्पद घटना नुकतीच घडल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांनी केलेल्या कामाचे पैसे मागितल्याने मालकांनी मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, अर्जुन नामक व्यक्ती काकती येथील एका बँड कंपनीत कामाला होता. गुढीपाडवा असल्याने अर्जुनच्या १७ वर्षीय मुलीने मजुरीचे …
Read More »मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू
अहमदनगर : मांजरीला वाचवताना 5 जणांचा विहीरीत बनवलेल्या शोष खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी हा शोषखड्डा बनवण्यात आला होता. यामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या …
Read More »बस ५० फूट खाणीत कोसळून भीषण अपघात, १२ मजुरांचा मृत्यू
दुर्ग : बस ५० फूट खाणीत कोसळून अपघात झाला आहे. या बस अपघातात १२ मजुरांचा मृत्यू झाला. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये ही घटना घडली आहे. दुर्गमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने बस ५० फूट खोल खाणीत कोसळली आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे …
Read More »हैदराबादचा पंजाबवर २ धावांनी निसटता विजय
पंजाबच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने निसटता विजय मिळवला आहे. अखेरच्या चेंडूवर हैदराबादने पंजाबवर अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा संघासाठी तुफान खेळी केली. या दोघांनी ५० अधिक धावांची शानदार भागीदारी रचली पण संघाला विजय मिळवून देण्यात अवघ्या दोन धावांनी …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या चापगाव, बेकवाड, हलसी भागात प्रचार दौरा!
खानापूर : उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 10 रोजी चापगावसह विविध भागात प्रचार दौरा व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी 10.30 वाजता चापगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी, त्यानंतर सकाळी 11 वाजता बेकवाड, दुपारी 12.30 वाजता हलशी दुपारी 1.30 …
Read More »बेळगाव शहरात गुरुवारी रमजान ईद होणार साजरी
बेळगाव : बेळगाव शहरात रमजान सणाची ईद नमाज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंजुमन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे असे अंजुमनचे अध्यक्ष आमदार राजू सेठ यांनी सांगितले. आज मंगळवारी सायंकाळी अंजुमन सभागृहात हिलाल कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत शहराचे मुफ्ती, मौलाना आणि …
Read More »फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta