निपाणी (वार्ता) : येथील आऊबाई काशिनाथ मेस्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त जेवणावळीला फाटा देऊन सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजकुमार मेस्त्री आणि ॲड. दिलीप मेस्त्री परिवारातर्फे अर्जुनी येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला. यावेळी २५ हजार रुपयांची बारा फूट रोपे जेसीबीने खड्डे काढुन लावण्यात आली. याशिवाय उन्हाळा संपेपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून …
Read More »बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेच्या रथाचे काम अंतिम टप्प्यात
बिजगर्णी : येथील महालक्ष्मी यात्रेची तयारी जय्यत सुरू झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे रथ. या रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बिजगर्णी व कावळेवाडीतील सुतार कुटुंबियांनी रथ बांधणीचे काम स्वीकारले आहे. 16 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या लक्ष्मी यात्रेची तयारी यात्रोत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी पूर्व नियोजित विधिवत कार्यक्रम आयोजित …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांच्यातर्फे 11 पासून ‘बेळगाव हिंदकेसरी’ जंगी बैलगाडा शर्यत
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ यांच्यातर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येत्या गुरुवार दि. 11 ते रविवार दि. 14 एप्रिल 2024 या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत ‘बेळगाव हिंदकेसरी -2024’ किताबासाठीची बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. अनगोळ (बेळगाव) येथील …
Read More »खानापूर समितीकडे निरंजन सरदेसाई, रणजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढविणार असल्याने इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार आज खानापूर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई व समितीचे सदस्य हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील या दोघांनी आपला अर्ज समितीकडे सादर केला आहे. …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
निपाणी (वार्ता) : संपूर्ण कर्जमाफीसह घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या अधिकाऱ्यांना त्वरित थांबवावे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला नाही. असे असताना कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांकडे आर्थिक …
Read More »बेळगावातील विविध चेकपोस्टवर 14 लाखांहून अधिक रोकड जप्त
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विविध चेकपोस्टवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना दणका दिला. काल संध्याकाळी गोकाकच्या घटप्रभा चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय वाहतुक करण्यात येत असलेली १.७० लाखांची रक्कम जप्त केली. काल संध्याकाळी ४ च्या सुमारास कुडची चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी …
Read More »शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे, तर आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या …
Read More »तैवान भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5
नवी दिल्ली : चीनच्या शेजारी असलेल्या तैवान देशात 7.7 तीव्रतेचा भीषण भूकंप झाला आहे. यामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. अधिक चिंतेचं कारण म्हणजे, तैवान, जपानचा ओकिनावा परिसर आणि फिलीपाईन्समध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. पूर्व तैवानमध्ये भूकंप आल्यानं तिथं इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. तैवानमधला गेल्या 25 वर्षातला …
Read More »लखनऊ सुपरजायंट्सकडून आसीबीचा २८ धावांनी पराभव
बेंगळुरू : आयपीएल २०२४ मधील १५वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनऊने मयंक यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आसीबीचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या विजयात मयंक-डी कॉक यांच्याशिवाय कर्णधार …
Read More »छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बुधवारी सकाळी एका कापडाच्या दुकानाला आग लागली. या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातले सात जण या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. छत्रपती संभाजी नगरमधल्या छावणी भागात ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. छत्रपती संभाजीनगरमधल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta