कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर 14 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे. …
Read More »बस चालकाला एअर गन दाखवून एकाची दादागिरी!
बेळगाव : बेळगावातील आर.एन. शेट्टी कॉलेज सर्कलजवळ कार चालकाने केएसआरटीसी चालकावर एअर गन दाखविल्याची घटना दुपारी घडली. याबाबत माहिती अशी की, एक कार केएसआरटीसी बसच्या विरुद्ध दिशेला आली. त्यावेळी कारमध्ये असलेल्या आझम नगर येथील मोहम्मद शरीफ याची आणि केएसआरटीसी बस चालक मल्लिकार्जुन यांच्याशी शाब्दिक शिवीगाळ झाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना …
Read More »अबकी बार कारवार लोकसभा मतदार संघातून समिती उमेदवार….
खानापूर : राष्ट्रीय पक्षानी सातत्याने मराठी भाषिक आणि मराठा समाजाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने कारवार लोकसभा निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे त्यामुळे शिवस्वराज्य जनकल्याण फाऊंडेशनतर्फे समितीच्या निर्णयाला जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला असून समितीने उमेदवार जाहीर करण्यास विलंब करू नये अशी मागणी करण्यात …
Read More »रमजान, होळी शांततेत साजरी करा : पोलिस आयुक्त इडा मार्टिन
हिंदू-मुस्लीम पंच समिती बैठकीत सूचना बेळगाव : सध्या रमजान महिना सुरु झाला आहे. याच काळात हिंदू सणही होत आहेत. पुढील आठवड्यात होळी असून ती शांततेत व्हावी यासाठी हिंदू व मुस्लिम पंच समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना पोलिस आयुक्त इडा मार्टिन मार्बानियांग यांनी केली. येथील जुन्या पोलिस आयुक्तलायच्या समुदाय …
Read More »अथणी येथे अवैध दारूचे २० हून अधिक बॉक्स जप्त
अथणी : अथणी तालुक्यातील नांदगाव हद्दीतील कोडगनूर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले मद्याचे २० हून अधिक बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. अथणी पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवानंद कारजोळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोडगनूर रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीने अवैधरित्या मद्याचे बॉक्स जमा केल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी, नांदगाव येथील रवी शाबू …
Read More »जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय बैठकांचा जोर वाढला आहे. महाविकास आघाडीच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, आज, गुरुवारच्या बैठकीत जागावाटप सूत्रावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीत सहभागाचे स्पष्ट संकेत दिलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेचीही आज बैठक …
Read More »महायुतीत जागावाटपाचा पेच, तोडगा काढण्यासाठी नेते दिल्ली दरबारी, आतातरी तिढा सुटणार?
मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्यानं हा पेच आता दिल्लीतच सुटणार अशी चिन्ह दिसत आहेत. लवकरच महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक पार पडणार आहे. भाजप …
Read More »हायकोर्टाने बोर्ड परीक्षांबाबत निर्णय ठेवला राखून
५ वी, ८ वी, ९ वी, ११ वीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता, शिक्षक गोंधळात बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांच्या इयत्ता ५ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिलेल्या राज्य सरकारच्या याचिकेवरील निकाल …
Read More »कॉंग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज शक्य; बेळगावातून मृणाल, चिक्कोडीतून प्रियांका तर कारवारमधून अंजली निंबाळकर
१७ उमेदवार निश्चित, चार मतदारसंघात पेच बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रलंबित असलेल्या मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत बैठकांची मालिका सुरूच ठेवली आहे. १७ उमेदवारांची नावे निश्चित झाली असून राज्यातील चार मतदारसंघाचा पेच अजूनही कायम आहे. आज रात्री उशीरा किंवा उद्या (ता. २१) उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »बेवारस मृतदेहावर समाजसेविकेकडून अंत्यसंस्कार!
बेळगाव : निराधार व्यक्तीला आधार देणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी एका बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार केले आहे. वन वन फिरून आपले जीवन काढत असणारे अनाथ वृद्धाचा मृत्यू झाला पण अंतिम संस्कार कोण करणार हा प्रश्न पडला होता. समाजसेवेची नेहमी तळमळ असणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी अंत्यसंस्कार केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta