Sunday , October 27 2024
Breaking News

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत मराठीचाही वापर करा

Spread the love

 

बेळगाव : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत इंग्रजी आणि कन्नडसह मराठी भाषेतील चिन्हे लावण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मंत्री सतीश जारकीहोळी यांना करण्यात आली.
बेळगावात कन्नड आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. मात्र, स्मार्टसिटी योजनेंतर्गत विकासादरम्यान फलकांवर फक्त इंग्रजी आणि कन्नड भाषाच दिसत आहेत. बेळगावातील मोठ्या संख्येने मराठी भाषिकांच्या हितासाठी मराठीतही फलक लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भात बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. याबाबतची अधिक माहिती महाराष्ट्र एकीकरण शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, सागर पाटील, महादेव पाटील, सुनील बोकडे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कोणत्याही परिस्थितीत काळ्या दिनाची सायकल फेरी काढणारच; पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती नेत्यांचा निर्धार

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *