Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मोबाईलपासून लांब राहून एकाग्रतेने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा : प्रा. एम. बी. निर्मळकर

  बेळगाव : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या जगात टिकायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे. आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण यश खेचून आणू शकतो, असे विचार ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य एम. बी. निर्मळकर यांनी व्यक्त केले. …

Read More »

सासऱ्याने झाडली जावयावर गोळी!

  रायबाग : सासऱ्याने जावयावर गोळीबार केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मोरब गावात घडली. ५४ वर्षीय धनपाल असंगी यांनी त्यांचा जावई ३२ वर्षीय शांतीनाथ यांच्यावर गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी मिळालेल्या रिव्हॉल्व्हरमधून त्यानी एक राऊंड फायर केला. ३० गुंठे जमिनीच्या वादातून धनपालने जावई शांतीनाथ याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी …

Read More »

काळेनट्टी गावच्या महिलांचा रोजगारासाठी मार्कंडेयनगर पंचायतीला घेराव

  बेळगाव : मार्कंडेयनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या काळेनट्टी गावामध्ये जास्ती संख्येने दलीत समाजाची गरीब कुटुंबे रहातात. गावातील या गोरगरीब कष्टकरी महिलांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा (2005) आल्यापासून आजतागायत (2024) मार्च महिना अर्धा झालातरी मार्कंडेयनगर ग्रामपंचायतीमार्फत मनरेगा अंतर्गत काम मिळालेले नाही. काळेनट्टी गावातील या दलीत गरीब महिलांनी …

Read More »

डॉक्टर, नर्सच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा व नवजात अर्भकाचा मृत्यू

  बेळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतीण महिलेचा आणि तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. संतीबस्तवाड येथील या महिलेची किणये प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर थोड्याच वेळात अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील २८ वर्षीय लक्ष्मी …

Read More »

एसएसएलसी परीक्षा केंद्राभोवती २०० मीटर परिसरात संचारबंदी: जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : परीक्षेतील अनियमितता, अनावश्यक गोंधळ व गैरसोय होणार नाही यासाठी परीक्षा कर्मचाऱ्यांनी नीटनेटकी यंत्रणा निर्माण करून जबाबदारीने काम करावे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. शिक्षण विभागाच्या वतीने कुमार गंधर्व कला मंदिरात आज सोमवारी (१८ मार्च) आयोजित एसएसएलसी वार्षिक …

Read More »

२०१६ पासून राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयुक्तांची नियुक्तीच नाही- माहिती अधिकारातून माहिती उघड

  बेळगाव : कर्नाटक सरकार आपल्या राज्यातील विविध अल्पसंख्याक भाषिक समुदायाला दुय्यम वागणूक देत त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवीत आहे, राज्यात मराठी, तुळू ,कोकणी, तेलगू, तमिळ, मल्याळम, उर्दू इत्यादी भाषिक कर्नाटक राज्यात अल्पसंख्यांक आहेत, अलीकडेच कर्नाटक सरकारने कन्नड भाषा समग्र अभिवृद्धी कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन जनतेला वेठीस धरत …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोरगाव चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी

  निपाणी (वार्ता) : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोरगाव सर्कल येथे तालुका प्रशासन व पोलीस खात्यातर्फे चेकपोस्ट उभारणी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात पैसे, भेट वस्तू, मद्याची गैर वाहतूक होऊ नये. या वाहतुकीवर नजर असावी. यासाठी या ठिकाणी चेक …

Read More »

मातृभाषेचे ऋण फेडण्याची शेवटची संधी…

  (५) जितक्या सहजतेने सीमाभागातील लोक शासकीय आणि राजकीय गुलामगिरीत स्वतःला झोकून देत आहेत. तितकीच भीषण अवस्था भविष्यात मराठी भाषेची होणार आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वावर आता अखेरची घंटा वाजत असताना राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले गेलेले मराठी भाषिक मात्र वैयक्तिक आयुष्यात मश्गूल आहेत. त्याच्या दहापट जास्त भयानक आणि गंभीर अवस्था येणाऱ्या …

Read More »

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात; चार ठार

  पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू …

Read More »

सीमाप्रश्नी पत्र मोहिमेत दिल्लीतील दाम्पत्याचाही सहभाग

  बेळगाव : केंद्रीय गृहमंत्रालयाला १०१ पत्रांची मोहीम गेल्या चार दिवसापूर्वी राबविली होती, सीमाभागाच्या विविध भागातून नोंदणीकृत पत्र देशाच्या गृहमंत्र्यांना पाठवून केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव येथील समिती कार्यकर्ते किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे आदींनी राबविलेल्या मोहिमेत …

Read More »