बेळगाव : जनता आणि कन्नड समर्थक संघटनांच्या मागणीनुसार सुवर्ण विधानसौधा येथे सीमा आयोगाचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे, कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कर्नाटक सीमा व नद्या संरक्षण आयोगाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले …
Read More »देगांव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार
खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याच्या खुशीत वसलेल्या देगांव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार झाली असल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, देगांव येथील शेतकरी पुंडलिक गावडा यांच्या, म्हैस व रेड्यावर वाघाने हल्ला केल्याने रेडा जागीच ठार झाला. तर या हल्यात जखमी झालेली म्हैस थोड्या …
Read More »बेळगावात हुक्का बारवर पोलिसांचे छापे; 2,56,600 रुपयांचा माल जप्त
बेळगाव : राज्यात हुक्का बारवर बंदी असतानाही शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधपणे चालवण्यात येत असलेल्या हुक्का बारवर बेळगाव पोलिसांनी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे 2,56,600 रुपयांचे हुक्का व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या हुक्का आणि तंबाखूजन्य पदार्थांचे घटक कुठून तरी …
Read More »समितीला संधीसाधूंची नाही तर गरज निष्ठावंत नेतृत्वाची….
(४) गेल्या काही वर्षात सीमाभागात राष्ट्रीय पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे समितीकडे संधी म्हणून पाहणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली आणि सोबत समितीत संधी मिळत नाही म्हणून राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली. गट तट, आर्थिक आरोप अशी वरवरची कारणे सांगून समितीवर चिखलफेक करून स्वार्थासाठी आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे …
Read More »गॅरंटी योजनेमुळे काँग्रेसने इतिहास रचला
पालकमंत्री सतीश जारकिहोळी; निपाणीत मेळावा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सरकारने गॅरंटीच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पहिल्याच बैठकीत आश्वासनांची पूर्तता केली आहे. त्यामुळे महिलासह कुटुंबाचे सबलीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन पालकमंत्री …
Read More »महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गौरव
येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी अश्वारूढ पंचधातूची मूर्ती उभी करण्यात आली. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून तसेच येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेल्या बारा वर्षांपासूनचे येळ्ळूरवासियांचे स्वप्न साकार झाले, अन हजारो …
Read More »तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा
लातूर : मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या …
Read More »पाचवी ते ११ वी पर्यंतच्या बोर्ड परीक्षेला आता ‘सर्वोच्च’ स्थगिती
सुरू असलेली बोर्ड परीक्षा अडचणीत बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कर्नाटक राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ५, ८, ९ आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या बोर्ड परीक्षांना स्थगिती दिली आहे, नोंदणीकृत विनाअनुदानित खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेने या परीक्षेला आव्हान दिले होते. या स्थगितीमुळे सोमवार (ता. ११) पासून सुरू असलेली बोर्ड परीक्षा …
Read More »हर, हर महादेवाच्या गजरात निपाणीत रथोत्सव; हजारो भाविकांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : विविध वाद्यांचा गजर आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील महादेव गल्लीतील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणीकर सरकार, युवराज सिद्धोजीराजे देसाई- सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून …
Read More »चारा, पाण्याची सोय न केल्यास रास्तारोको
रयत संघटनेचा इशारा; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने चार-पाच महिन्यापूर्वीच चिकोडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे. पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी नुकसान भरपाई निधी मिळालेला नाही. त्याचप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी गोशाळा सुरू कराव्यात. जनावरांच्या चारा, पाण्याची १८ मार्चपूर्वी सोय न केल्यास बेळकुड गेट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta