Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

राज्यात ४० पोलिस उपाधीक्षक, ७१ निरीक्षकांच्या बदल्या

  बेळगाव : शासनाने बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील पोलिस उपाधीक्षक आणि निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावला आहे. राज्यातील ४० उपाधीक्षक आणि ७१ पोलिस निरीक्षकांचा यात समावेश आहे. खानापूर येथील पोलिस ट्रेनिंग स्कूलचे उपअधीक्षक एस. डी. सत्यनायक यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी कर्नाटक लोकायुक्त विभागाचे उपअधीक्षक निलाप्पा ओलेकार यांची …

Read More »

येळ्ळूर येथे बी. एल. कानशिडे यांना श्रद्धांजली

  येळ्ळूर : समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. बी. एल. कानशिडे यांचे (वय ८२) नुकतेच निधन झाले. त्याबद्दल समाज शिक्षण संस्था व महाराष्ट्र हायस्कूलतर्फे शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा लिला मेणसे होत्या. कै. बी. एल. कानशिडे यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे मुख्याध्यापक बी. पी. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या दाव्यात साक्षी पुरावे घेण्यासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली; पण प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात मात्र होऊ शकली नाही, अशी खंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. सीमाप्रश्नाच्या दाव्याचा महाराष्ट्राने गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी आग्रही …

Read More »

बालप्रतिभावंतांकडून मराठी साहित्याचा जागर

  बेळगाव : बेळगावातील गोगटे रंगमंदिरात आज बालप्रतिभावंतांकडून मराठी साहित्याचा जागर करण्यात आला. निमित्त होते, वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बालसाहित्य संमेलनाचे. वाचनाची आवड जोपासा, ज्ञानाच्या कक्षा वाढवा असे आवाहन संमेलनाचे उदघाटक उद्योजक एम. एन. राजगोळकर यांनी केले. बेळगावातील गोगटे रंगमंदिरात आज शनिवारी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बालसाहित्य संमेलनाचे …

Read More »

व्हीएसएम जी. आय. बागेवाडी शाळेत बाल दिनानिमित्त जुन्या खेळांना उजाळा

  निपाणी (वार्ता) : येथील व्हीएसएम जी. आय. बागेवाडी प्राथमिक शाळेत बाल दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या खेळांना उजाळा दिला. प्रारंभी डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एन. एस. मादनावर, वाय. बी. हंडी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. डॉ. एस. …

Read More »

ममदापूर तुळजाभवानी मंदिरात हजारो दिव्यांनी कार्तिक दीपोत्सव

  निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल) येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता. आप्पासाहेब पुजारी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाकर यांच्या हस्ते दीपस्तंभाचे पूजन झाले. दीपस्तंभ आणि मंदिर परिसरात …

Read More »

रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू

  देसूर : रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला. देसूर गावात जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटका जवळ आज शनिवारी दुपारी 12.15 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. भोमाणी चिमाजी नंद्याळकर (वय 60, राहणार – देसुर-बेळगाव) असे रेल्वेची धडक बसून जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यापासून भोमाणी चिमाजी …

Read More »

वडगाव येथील महिला मुलीसह बेपत्ता!

  बेळगाव : यरमाळ रोड, वडगाव, येथील एक महिला आपल्या मुलीसह गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्या मायलेकीचा शोध घेत आहेत. वैशाली सचिन किचाडे (वय 36), मुलगी सिद्धी (वय 12) दोघेही राहणार यरमाळ रोड, वडगाव, अशी त्यांची नावे आहेत. …

Read More »

खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला आग

  खानापूर : खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला अचानक आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकेचे महत्त्वाचे कागदपत्रे कम्प्युटर व फर्निचर इत्यादी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. सुदैवाने पैसे ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम पर्यंत आग पोहोचू शकली नाही. अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झाले असून आग …

Read More »

हिवाळी अधिवेशन काळात कडक बंदोबस्त ठेवा; आर. हितेंद्र यांच्या सूचना

    बेळगाव : दसरा, दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात बेळगावात हिवाळी अधिवेशन होत आहे. हिवाळी अधिवेशन चार डिसेंबर ते 15 पर्यंत चालणार आहे. अधिवेशनाची पूर्वतयारी, अधिवेशन काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देत, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आर. हितेंद्र यांनी घेतला. आर. हितेंद्र कालपासून दोन दिवसांच्या …

Read More »