Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

दलपतींना ‘ऑपरेशन हस्त’ची भीती; आमदारांच्या सुरक्षेसाठी रिसॉर्टमध्ये रणनीती

  बंगळूर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या धजदला आपल्या १९ आमदारांचे संरक्षण करण्याची डोकेदुखी झाली आहे. काँग्रेस नेत्यांच्या ‘ऑपरेशन हस्त’पासून आमदारांना वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व धजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी रणनीती आखत आहेत. हसनच्या रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांना नेऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर …

Read More »

शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात 10 नोव्हेंबरला मोर्चा : खासदार इराण्णा कडाडी

  खानापूर : राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवत आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्या दिवशी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे राज्यसभा सदस्य व …

Read More »

अवकाळी पावसामुळे खानापूरात भात पिकांचे नुकसान

  खानापूर : आज बुधवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच शाळा व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे व नोकरी निमित्त बेळगावला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी व नोकरदार वर्गाने आज दांडी मारून घरीच राहण्याचे पसंद केले. खानापूर तालुक्यात सध्या …

Read More »

महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारे 2 ट्रॅक्टर दिले पेटवून

  निपाणी : महाराष्ट्रातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कारदगा गावात घडली. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना काल रात्री घडली. महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

महामार्गासह सेवा रस्ता हरवला झुडपात

  वाहनधारकांसह नागरिकांतून संताप : सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १५ वर्षांपूर्वी होऊन वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर गतवर्षापर्यंत पूंज – लॉईड कंपनीने मार्गाच्या देखभालीसह रस्त्याकडेला झाडे लावणे व सुशोभीकरणाचे काम केले. त्यानंतर या कंपनीच्या देखभालीचीची मुदत संपली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह सेवारस्ते झुडपात …

Read More »

निपाणीत उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.९) सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर होणार आहे. अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी …

Read More »

म. ए. समितीचे माजी सचिव प्रा. चंद्रहास धुमाळ यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सचिव प्रा. चंद्रहास एकनाथ धुमाळ (वय ७४) यांचे बुधवारी (ता.८) निधन झाले. प्रा. धुमाळ यांनी १९६७ पासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेळगाव जिल्ह्याचे सचिव म्हणून काम पाहिले. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात ३२ वर्ष प्राध्यापक म्हणून …

Read More »

खूशखबर! सोने-चांदी झालं स्वस्त, दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा

  नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करणाऱ्यासाठी खूशखबर आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी, बुधवारी सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली …

Read More »

कार कालव्यात पडून 5 जणांचा मृत्यू

  मंड्या : मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर तालुक्यातील बनघट्टाजवळ मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मोटारचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार (कार) कालव्यात पडली. म्हैसूरकडून मोटार येत होती. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसू नये म्हणून कार वळवली आणि ती कालव्यात पडली. चंद्रप्पा, धनंजय, कृष्णप्पा आणि जयन्ना या तिघांचे वय अंदाजे 40 …

Read More »

डी. के. शिवकुमार – सतीश जारकीहोळींची गुप्त बैठक

  राज्याच्या राजकारणात खळबळ, बेळगावच्या राजकारणात शिवकुमाराची ढवळाढवळ नाही बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली व चर्चा केली. जारकीहोळी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. क्रिसेंट रोडवरील सतीश जारकीहोळी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात …

Read More »