Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष; विजयी सभाही होणार अन् गुलालही उधळणार

  मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत, आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, ‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून पहाटेपासूनच जल्लोष केला जात आहे. …

Read More »

जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीने बेळगावमधील इच्छुकांना धक्का

  बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीने भाजपच्या गोटात राजकीय चर्चा रंगली आली आहे. पक्षांतर्गत नाराजीमुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजपामध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. मात्र शेट्टर यांच्या घरवापसीमुळे लोकसभेच्या …

Read More »

मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह आझाद मैदानात गुलाल उधळणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

  मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या सगसोयऱ्यांवर आजच (26 जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अद्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती. मराठा जमाजाचे नेते …

Read More »

नितीश कुमार यांचा यू-टर्न; जदयू-भाजपाच्या सरकारचा 28 रोजी होणार शपथविधी?

  पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ‘एनडीए’च्या वाटेवर आहेत. ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नितीश कुमार २८ जानेवारी रोजी जेडीयू आणि भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तर भाजप नेते सुशील मोदी हे नवे …

Read More »

गडकोट मोहिमेदरम्‍यान दरीत कोसळून हुपरीतील तरूणाचा मृत्‍यू

  हुपरी : भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर गडकोट मोहिमेदरम्यान एक (२५ वर्षीय) तरुण दरीत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हुपरी ता. हातकणंगले येथील तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सागर पांडुरंग वाईगडे (वय २५, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी …

Read More »

अध्यादेश निघेपर्यंत माघार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

  मुंबई : सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज वाशी येथील शिवाजी चौकात मराठ्यांच्या अफाट जनसमुदायासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी सरकारसमोर अनेक मागण्या ठेवल्या आहेत. त्यात प्रमुख म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे. सरकारी नोकरीत आमच्या जागा राखून ठेवा. ही मागणी …

Read More »

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

  शहराच्या विकासासाठी मंदिर परिसर विकास आराखड्याला सहकार्य करण्याचे व्यापाऱ्यांचे आश्वासन कोल्हापूर (जिमाका): श्री अंबाबाई मंदिर हे चिरंतन टिकणारे मंदिर आहे. मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देवून कोल्हापूर शहर आणि येणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, …

Read More »

बेळगाव सीमाप्रश्न महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी विसरत चालली आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार

  मुंबई : ‘बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचाच असून बेळगाव सीमाभागा विना संयुक्त महाराष्ट्र अपुरा आहे पण महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी हा बेळगाव सीमाप्रश्न विसरत चालली आहे. या बेळगाव सीमासंदर्भात महाराष्ट्रातील साहित्यिकानी सदैव आपल्या प्रखर लेखणी द्वारे समाज जागृती करणे महत्वाचे असून महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला बेळगाव हा महाराष्ट्राचा भूभाग असून …

Read More »

निपाणीत २७, २८ रोजी टेबल टेनिस स्पर्धा

  नवीन शहा; आंतरराज्य खेळाडूंचा समावेश निपाणी (वार्ता) : निपाणी टेबल टेनिस असोसिएशनतर्फे येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर २७ व २८ रोजी भव्य खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख ८० हजारहून अधिक …

Read More »

बोरगाव येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज हितासाठी सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असणा-या बोरगाव येथील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरास उत्सुकूर्त प्रतिसाद मिळाला. बोरगाव व परिसरातील नागरिकांसाठी साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने हृदयविकार, मूत्रविकार, मुतखडा, हाडाची लक्षणे , मोफत उपचार, मोफत ईसीजी व मोफत रक्तातील साखर …

Read More »