Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

अतिथी व्याख्यात्यांचे सेवासुरक्षेसाठी एका पायावर उभे राहून अनोखे आंदोलन

  बेळगाव : सेवेत कायम करावे या मागणीसाठी बेळगाव जिल्हा प्रथम श्रेणी महाविद्यालयांच्या अतिथी व्याख्याता संघटनेच्या सदस्यांनी आज एका पायावर उभे राहून अनोखे आंदोलन केले. शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात कार्यरत व्याख्यात्यांना सेवेत कायम करावे, त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी अतिथी व्याख्यात्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत एका …

Read More »

माजी आमदार रघुनाथराव कदम यांची पुण्यतिथी गांभीर्याने

  निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, उद्योजक रघुनाथराव विठ्ठलराव कदम यांची पुण्यतिथी गुरुवारी (ता.२८) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात गांभीर्याने झाली. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी निपाणी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. येथील मराठा मंडळ संस्कृतीक भवनात निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश …

Read More »

निपाणीतील शिबिरात ८४ रुग्णांना श्रवणयंत्र वाटप

  निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब, बेळगाव रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि अमेरिकेतील बर्मींग होमच्या संयुक्त विद्यमाने येथील रोटरी क्लबमध्ये मोफत श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरू तारळे यांनी स्वागत केले. निपाणी परिसरात प्रथमच या श्रवण यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीनंतर सुमारे …

Read More »

पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेला प्रारंभ : 1800 हून अधिक कराटेपटूंनी घेतलाय स्पर्धेत भाग

  बेळगाव : स्वसंरक्षणासाठी कराटे गरजेचा असून सद्य परिस्थिती पाहता महिला आणि मुलींनी आवर्जून कराटेचे प्रशिक्षण घ्यावे असे केएसपीएस जिल्हा पोलीस प्रमुख आणि खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमसिद्ध गोंधळे म्हणाले. बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने आयोजित पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन शिवबसवनगर-बेळगाव येथील केपीटीसीएल सभागृहात करण्यात आले …

Read More »

क्रांतीसूर्यमुळे सीमाभागातील गुणवंतांचा गौरव

  राजेंद्र वडर -पवार : कोल्हापूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम निपाणी (वार्ता) : समाजात चांगले काम करणाऱ्यांची संख्या विरळ आहे. विविध क्षेत्रात आपले काम सांभाळत समाजकारण करणारे लोक कमी आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देण्याचे काम क्रांतीसूर्य फाउंडेशनने केले आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे …

Read More »

उद्धव ठाकरेंचा 23 लोकसभा जागांचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला

  मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 23 जागांची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने खूप जागा जिंकल्या होत्या, पण त्यांचे अनेक उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात आहेत. शिवसेनेने मागणी केलेल्या 23 लोकसभा जागा, काँग्रेस पक्षाने …

Read More »

3-4 महिन्यांपूर्वी प्रत्येकजण मला शिवीगाळ करत होता; राहुलने व्यक्त केल्या भावना

  नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये सलग दुसरे शतक झळकावणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सोशल मीडियावर ट्रोल्सचा सामना करण्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल उघडपणे बोलला आहे. इतर खेळाडूंप्रमाणे वहाबलाही नकारात्मक टिप्पणीचा फटका बसतो यावर त्याने भर दिला. राहुल म्हणाला की, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीमुळे स्वत:बद्दल विचार करण्यास वेळ …

Read More »

प्रियांका गांधींच्या अडचणी वाढल्या, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच उल्लेख

  नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातील चार्जशीटमध्ये हा उल्लेख …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल)येथील मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये स्व. पद्मभूषण देवचंदजी शाह यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रकाश शाह उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी ‘कलेमध्ये माणसाचे मन वेडावून टाकण्याचे सामर्थ्य असते. कला ही माणसाच्या …

Read More »

साखरमंत्र्यांच्या वक्तव्यामुळेच शेतकऱ्याची आत्महत्या

  मृतदेह दवाखान्यासमोर ठेवून रयत संघटनेचे आंदोलन ; १ कोटी रुपये भरपाईची मागणी निपाणी (वार्ता) : राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळेच हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव तालुक्यातील शाबाज मधील शेतकरी चंद्रप्पा चंद्रापूर यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये व त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी …

Read More »