खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ते हलशी या आप्रोच रस्त्याची फार भयंकर दुर्दशा झाली असुन खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्यावर पाणी साचले आहे.
या रस्त्यावरून कारखान्याला जाणाऱ्या अवजड वाहनातुन ८० टन माल वाहतुक वर्षभर केली जाते. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याची दुरूस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे. अशी मागणी या भागातील जनतेतुन होत आहे.
