खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात खानापूर तालुक्यातील बिडी सर्कलमधील झुंजवाड के जी गावातील सर्वे नंबर १४६ /४ मधील शेतकरी कौशल्या बाळेकुंद्री यांच्या शेतातील मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मिरचीची लागवड केल्यापासुन कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकही बंद झाली. त्यात हातातोंडाशी आलेली मिरची पिक काढणे शक्य झाले नाही. लाखो रूपये खर्च करून मिरच्या झाडावरच पिकून गेल्या, त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसला.
त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या तसेच तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन मिरचीचे वाया गेलेल्या पिकाला नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
