खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी अचानक खानापूर तालुक्याच्या भेटीवर आलेल्या एमएलसी व मुख्यमंत्री सचेत महांतेश कवटगीमठांनी शांतिनिकेतन स्कूलमध्ये आयोजित केलेल्या व महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती समितीच्यावतीने व श्रीमहालक्ष्मी ग्रुप, राष्ट्रीय संघ, व जनकल्याण ट्रस्ट यांच्यावतीने सुरू केलेल्या महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट दिली.
यावेळी कोविड सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, तहसीलदार रेश्मा तालिकोटी, धनश्री सरदेसाई आदी मान्यावर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री सचेत महांतेश कवटगीमठ यांनी श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरबद्दल प्रशंसा करून समाजकार्य केल्याबद्दल गौरवोद्गगार काढले व त्याच्या कार्याला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले.
यावेळी कोविड केअर सेंटरचे उपाध्यक्ष पंडित ओगले, सचिव सदानंद पाटील, आकाश थणीकर, पदाधिकारी कार्यकर्ते, भाजपाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
