बेळगाव : जुना पी. बी. रोड येथे गेल्या काही दिवसापासून एक मतिमंद मुलगा नाल्याच्या पाईपमध्ये रहात होता ही माहिती हेल्प फॉर नीडी ऑटो अम्ब्युलन्सचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. माधुरी जाधव पाटील यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्या मुलाला आधार मिळवून देण्याकरिता त्याची विचारपूस करण्यासाठी माधुरी जाधव त्या मतिमंद मुलाकडे गेल्या त्या मुलाची चौकशी करत असताना अचानक त्या मुलाने तेथून पळ काढत चक्क तो लेंडी नाल्यात उतरून पाईपमध्ये जाऊन बसला. गौतम कांबळे यांनी धाडसाने नाल्यात उतरून त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला पण तेथे त्यांना यश आले नाही. दोन तासाच्या प्रयत्नानंतर शेवटी त्याला पाईपमधून बाहेर काढण्यात यश आले. तो मुलगा घाबरून गेला होता आणि भुकेला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले सुरेंद्र अनगोळकर, अनिल अष्टेकर यांनी खायला देऊन पाण्याची व कपड्यांची सुविधा केली. श्रीरामसेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते निलेश पाटील, भरत नाग्रोळी, राजेंद्र बैलूर, मुकेश राजपुरोहित, सौरभ कुंदप उपस्थित होते. त्यानंतर त्या मुलाची खासबाग येथील महानगरपालिका निराधार आश्रय केंद्रात राहण्याची व्यवस्था केली. यासाठी सुरेंद्र अनगोळकर यांनी गौतम कांबळे आणि माधुरी जाधव यांचे या कार्यासाठी कौतुक करुन आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta