Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यात दोन नवीन शववाहिका दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी सोयीस्कर ठराव्यात, यासाठी महानगरपालिकेने दोन नवीन अत्याधुनिक शववाहिका खरेदी केली असून, आज दोन्ही आमदारांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

शहरातील अंत्ययात्रांसाठी नागरिकांना वेळेवर सुविधा मिळावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून या शववाहिका घेण्यात आल्या आहेत. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि आयुक्त कार्तिक एम. यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून जनतेसाठी अर्पण करण्यात आले.

यावेळी शहरातील नगरसेवक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. “बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने दोन अत्याधुनिक मुक्ती वाहने खरेदी करण्यात आली आहेत. भविष्यात आणखी दोन वाहने घेण्याचा आमचा विचार आहे. महापालिका प्रशासनाने या वाहनांचे डायरी मेंटेनन्स व्यवस्थित करावे आणि सर्वांनी मिळून बेळगावच्या विकासासाठी काम करावे,” असे आवाहन आमदार आसिफ सेठ यांनी केले.

आमदार अभय पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही नवीन वाहने उपलब्ध करून दिली आहेत, मात्र महानगरपालिकेने त्यांची देखभाल चोख ठेवली पाहिजे. यापूर्वी इंजिन सीझ होण्यासारखे प्रकार घडले आहेत, तशी पुनरावृत्ती झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या पगारातून पैसे कापले जातील,” असा इशारा अभय पाटील यांनी दिला. तसेच आगामी काळात दक्षिण मतदारसंघासाठी आमदार निधीतून आणखी एक वाहन देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या लोकार्पण सोहळ्याला स्थायी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *