Tuesday , March 3 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने बाल संस्कार शिबिर

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने हिंडलगा येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत ‘बाल संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले. यामध्ये संस्कृत श्लोक, संस्कारक्षम प्रार्थना, देशभक्तीगीत आणि संपूर्ण वंदे मातरम् विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले.
प्रारंभी प्राचार्या आरती पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, वसुधैव कुटुंबकम्, वडीलधाऱ्यांचा आदर, अतिथी देवो भव आणि विविधतेत एकता ही भारतीय संस्कृतीची काही मुख्य मूल्ये आहेत. आजच्या काळात जेव्हा आपण पाश्चात्य संस्कृती आणि जीवनशैलीकडे आकर्षित होत आहोत, तेव्हा आपल्याला आपली भारतीय संस्कृती जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.
सुखद देशपांडे यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विविध संस्कृत श्लोक शिकवून त्यांचा अर्थबोध आणि महत्त्व सांगितले. विनायक मोरे यांनी अर्थपूर्ण प्रार्थना, देशभक्तीगीते आणि संपूर्ण वंदे मातरम् शिकवून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाचे संयोजन ज्योती प्रभू आणि पी. जे. घाडी यांनी केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *