Tuesday , March 3 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून; चिमुकल्या विद्यार्थी कवींची स्वरचित काव्यमैफल!

Spread the love

 

बेळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कवी संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा जागर केला.
या काव्यमैफलीत कु. राशी यल्लाप्पा पाटील, कु. पल्लवी राजकुमार पाखरे, कु. श्रवण महेश बेन्नाळकर या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभाशक्तीने सजवलेल्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कविवर्य कुसुमाग्रज यांची “कणा” ही कविता कु. आदिनाथ पाटील याने सादर केली. अशाप्रकारे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर श्रीमती पद्मश्री भेंडीगीरी, श्रीमती अनुपमा शिंदे, श्रीमती अश्विनी चकडे, श्रीमती आरती, श्रीमती शिल्पा अंगडी या शिक्षिकांनीही कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितांचे वाचन करून कार्यक्रमाची उंची वाढवली.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी स्वतः रचलेली बहारदार बडबडगीते सादर करून चिमुकल्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि ओघवते सूत्रसंचालन शिक्षिका आरती चिंगळी यांनी केले, तर संगीत शिक्षिका अक्षता मोरे यांच्या मराठी भाषा गौरव गीताने या संमेलनाची सांगता झाली. मराठी भाषेचा वारसा जपणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी विशेष कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *