
बेळगाव : दहावीच्या मार्क्स कार्डमध्ये नावात दुरुस्ती करून देतो असे सांगत बाराशे रुपयांची लाच मागणार्या सौंदत्ती तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा क्लार्क वेंकरेड्डी हनुमरेड्डी नगली याला एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.
सौंदत्ती तालुक्यातील हिरेबुधनूर गावच्या मारुती गौडा पाटील आणि त्यांचे मित्र दोघांनी मिळून एसएसएलसीच्या गुणपत्रिकेमध्ये चुकलेले नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
या कामासाठी क्लार्क वेंकट रेड्डी नगली यांनी 1200 रुपयांची लाच मागितली होती त्यानुसार पाटील यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे एसीबीकडे तक्रार दाखल दाखल केली होती.
दाखल केलेल्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने धाड टाकत 1200 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. एसीबीचे एसपी डी. एस. न्यामगौडा, डीवायएसपी करुणाकर शेट्टी. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. गोदीकोप्प यांनी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta