Sunday , July 26 2026
Breaking News

महिलांच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव उत्तरच्या आमदारांकडून आश्वासनपूर्ती

Spread the love

 

बेळगाव : उत्तर मतदारसंघातील जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भांदुर गल्लीतील रहिवाशांची अनेक वर्षांची समस्या मार्गी लावली आहे. महिलांनी केलेल्या विनंतीनुसार विकासकामे पूर्ण झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील भांदुर गल्ली, फूलबाग गल्ली आणि तहसीलदार गल्लीतील रहिवाशांची अनेक वर्षांपासूनची समस्या आता सुटली आहे. दीड महिन्यापूर्वी या भागात रस्ते कामाचा शुभारंभ करण्यासाठी आसिफ सेठ आले असता, स्थानिक महिलांनी सांडपाणी वाहिनीची समस्या मांडली होती. रस्ता करण्यापूर्वी युजीडी दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर तातडीने कार्यवाही करत आमदारांनी रस्त्याचे काम थांबवून आधी युजीडी कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आता युजीडीचे काम पूर्ण झाले असून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची जोडणीही करण्यात आली आहे. यानंतर आता पुन्हा रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली असून, फूलबाग गल्ली येथे कामाचा शुभारंभ झाला.

भांदुर गल्लीसह परिसरातील सर्व गल्ल्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आसिफ सेठ यांनी म्हटले. प्रभागातील समस्या तातडीने सोडवल्याबद्दल स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त केले असून, दिलेला शब्द पाळल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली.
या प्रसंगी नगरसेवक इंद्रजीत पाटील, अमान सेठ, लता माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *