Tuesday , March 3 2026
Breaking News

कलाश्री बक्षीस योजनेला मच्छे परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री उद्योग समूह यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाचव्या ग्राहक बक्षीस योजनेला मच्छे परिसरातून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मच्छे येथील जयभारत को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. येथे नव्या सदस्यांना नोंदणीपत्र व कुपन बुकचे वितरण करण्यात आले.

या बक्षीस योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना केवळ 500 रुपये भरून सदस्य नोंदणी करता येत आहे. या योजनेत आकर्षक अशी एकूण 21 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मुख्य विजेत्यास ट्रॅक्टर व रोख दीड लाख रुपये, तर दुसरे बक्षीस म्हणून कार व दीड लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच इतर विविध बक्षिसांमध्ये एकूण 21 विजेत्यांची निवड करण्यात येणार असून, 21 वे बक्षीस म्हणून 50 हजार रुपयांची ठेवपावती पाच वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी कलाश्री क्रेडिट सोसायटी तर्फे देण्यात येणार आहे.

मच्छे येथील जयभारत सोसायटीचे चेअरमन तसेच कलाश्री योजनेचे डीलर गंगाधर लाड यांच्याकडे कुपन बुक सुपूर्द करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी पाटील, आशिष कुमार, मालजी पाटील, पारिश कोलकार यांच्यासह सोसायटीचे संचालक जोतिबा डुकरे, अशोक लाड, जयपाल चौगुले, शांता डेळेकर, विष्णू सुतार, महादेव करेन्नावर यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांना नोंदणीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी कलाश्री ग्रुपचे चेअरमन प्रकाश डोळेकर, संचालिका सुकन्या डोळेकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. या योजनेला परिसरातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात अधिकाधिक ग्राहक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *