Tuesday , March 3 2026
Breaking News

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात पार पडले.
प्रमुख पाहुण्यांचे सुहासिनीने औक्षण करून स्वागत केले. रोपट्याला पाणी घालून अनोख्या पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
गोव्याच्या चित्रा क्षीरसागर या संमेलनाध्यक्षपदी होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा बडीगेर गोवा शासकीय महाविद्यालयाचे माजी उपपाचार्य हे होते. तारांगणच्या संचालिका अरुणा गोजे पाटील, मिसाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मिसाळे, इस्त्रो मधून निवृत्त झालेले विष्णूपंत मिसाळे, प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे, ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, कॅन्टोन्मेंट मराठी शाळेचे मुख्याध्यापक कवी प्रशांत बिर्जे व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गोविंद मिसाळे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत अरुणा गोजे पाटील यांनी केले.

आपल्या भाषणात संमेलनाध्यक्षा चित्रा क्षीरसागर म्हणाल्या की, साहित्यामुळे जीवन सुंदर बनते, कविता ही साहित्यातील एक प्रकार असून ती कविता मनाला भिडणारी असावी बोचणारी नसावी कवितेतून समाजच भलं चिंतल जावं. कृष्णा बडीगेर यांनी कविता कशी लिहावी याच मार्गदर्शन केलं एकापेक्षा एक सरस असं बेळगावातील कवी, कवयित्री व बालकवी यांनी आपले सादरीकरण केले. तब्बल ३५ कवींनी यात भाग घेतला. कविता कशी करावी यांनी कवींना मार्गदर्शन केले. विष्णुपंत मिसाळे यांनी गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे यांच्या आठवणी सांगितल्या. शिक्षण हाच तारणहार आहे हे वडिलांच्या शिकवणूकीमुळे आम्ही सर्व भावंडांनी आपले शिक्षण पूर्ण केले. संमेलनात बी. जी. पाटील, जी. व्ही. सावंत, प्रसाद सावंत, सहदेव कांबळे, मधु पाटील, चंद्रशेखर गायकवाड, किरण पाटील, प्रशांत बिर्जे, जोतिबा नागवडे, अशोक सुतार, प्रेमा मेणसी, आनंद मेणसी, गुरुनाथ किरमिटे, दीपा मिरींगकर, दया मित्रगोत्री, अपूर्वा ग्रामोपाध्ये, ईशानी पंडित पाटील, श्रेया लक्ष्मण गावडे, प्रशांत बिर्जे, मनीषा वड्डगोळ, गौतमी काजवे, धनश्री घुमटे यांनी कविता सादर केल्या.

प्रसाद सावंत यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. यावेळी केंद्र संचालिका सुधा माणगावकर, स्मिता मेंडके, नेत्रा मेनसे, सविता वेसणे, अर्चना पाटील, कवयित्री डॉ. मनीषा नाडगौडा, स्मिता किल्लेकर, अस्मिता आळतेकर, अपर्णा पाटील, रोशनी हुंदरे, स्नेहल बर्डे उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *