Saturday , March 7 2026
Breaking News

युवा समितीतर्फे 15 मार्च रोजी ‘इथे ओशाळाला मृत्यू’ नाट्यप्रयोग

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यातर्फे शिवगणेश प्रोडक्शन्स सिंधुदुर्ग, मुंबई निर्मित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची धगधगती शौर्यगाथा असलेल्या नाटकाचा प्रयोग येत्या रविवार दि. 15 मार्च 2026 रोजी दुपारी 3 आणि सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

उपरोक्त ऐतिहासिक नाटक बेळगाव शहरातील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे सादर होणार आहे. इथे ओशाळाला मृत्यू या नाट्यप्रयोगाचे प्रायोजक प्रसाद मेडिकल मॉल, शनिवार खुट, बेळगाव आणि आर. एम. चौगुले अँड असोसिएट्स हे आहेत. सदर नाट्यप्रयोगातून मिळणारा नफा हा युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. सदर नाट्य प्रयोगाच्या देणगी प्रवेशिका युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव, शिवाजी कुडूचकर ज्वेलर्स खडेबाजार शहापूर, डी. बी. पाटील फोटो स्टुडिओ बेळगाव, मसनाबाई ई स्कूटर शिवाजीनगर बेळगाव आणि प्रसाद मेडिकल मॉल शनिवार खुट बेळगाव या ठिकाणी उपलब्ध असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 8762764593, 8904197969 अथवा 7019668025 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रा वसंत कानेटकर लिखित, गणेश ठाकूर दिग्दर्शित आणि शिवगणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग मुंबई निर्मित इथे ओशाळला मृत्यू या नाट्यप्रयोगात गणेश ठाकूर मुख्य भूमिकेत असून डाॅ. सोनल लेले, प्रा. मिलिंद कासार, कृष्णा देसाई, संदेश देसाई, मंदार जंगम, विजय बर्डे व कुलदीप परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर मोगल सम्राट औरंगजेब सर्व शक्तीनिशी दक्षिणेत उतरला. छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 या नऊ वर्षात अत्यंत तडफेने औरंगजेबाशी शर्थीची झुंज देत स्वराज्यासाठी बलिदान दिले. या नऊ वर्षातील त्यांच्या धगधगत्या संघर्षाची आणि इतिहासाची गाथा या नाटकाच्या माध्यमातून सादर केली जाते. शिवगणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग, मुंबई ही ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर करणारी नामांकित संस्था असून गेल्या 10 वर्षात त्यांनी ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’, ‘ती फुलराणी’, ‘नरसिंह शिवराय’ यासारख्या दर्जेदार नाट्यकृती सादर केल्या आहेत. याखेरीज आतापर्यंत ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचे जवळपास 90 प्रयोग त्यांनी सादर केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *