Wednesday , August 26 2026
Breaking News

कडोलीत आज मराठी भाषा गौरव दिवस

Spread the love

 

कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिवस (कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस) साजरा करण्यात येणार आहे.

मराठी साहित्य संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कडोलीतील श्री शिवाजी हायस्कुलच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. एस. आर. गिंडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला साहित्य संघाचे सर्व कार्यकर्ते, कस्तुरबा महिला मंडळ व अन्य महिला मंडळे, युवक मंडळे तसेच गावातील सर्व मराठी भाषप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य संघाचे अध्यक्ष शिवाजी कुट्रे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *