Wednesday , August 26 2026
Breaking News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन

Spread the love

 

बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस आणि जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे होणार आहे.
या कवी संमेलनात मराठी भाषा तसेच महिला विषयावर आधारित कविता सादर केल्या जाणार आहेत. परिसरातील कवींनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी सर्व कवींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *