Tuesday , June 23 2026
Breaking News

कर्तव्य कठोर… पण मन माणुसकीने ओथंबलेले!

Spread the love

 

डी डी पी यू श्री एम एम कांबळे यांचे भावस्पर्शी छायाचित्र!

बेळगाव : द्वितीय पी.यू.सी.ची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा. या एका परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे कष्ट घेतलेले असतात. पण कधी कधी नियती वेगळीच परीक्षा घेते. अशाच एका अपघातग्रस्त विद्यार्थ्याने जखमी अवस्थेतही परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि परीक्षा केंद्रावर पोहोचला.

त्या वेळी बेळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष डी.डी.पी.यू. श्री. एम. एम. कांबळे यांनी दाखवलेली संवेदनशीलता उपस्थित सर्वांना स्पर्शून गेली. पायाला प्लास्टर असलेला तो विद्यार्थी व्हीलचेअरवर परीक्षा केंद्रावर आला होता. वेदना स्पष्ट दिसत होत्या… पण मनात परीक्षा देण्याची जिद्द तितकीच ठाम होती.
अशा वेळी श्री. कांबळे स्वतः पुढे आले. त्यांनी विद्यार्थ्याची विचारपूस केली, त्याला धीर दिला आणि अत्यंत काळजीपूर्वक त्याला परीक्षा केंद्रात पोहोचवण्याची व्यवस्था केली. विद्यार्थ्याचा हात धरून त्याला आधार देतानाचा तो क्षण पाहून अनेकांच्या डोळ्यात आदर दाटून आला.
शिस्तीबाबत कुठलीही तडजोड न करणारे, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून श्री. एम. एम. कांबळे यांची ओळख आहे. पण या घटनेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा पैलूही समोर आला….. कर्तव्यात कठोर असले तरी मनाने मात्र अत्यंत हळवे आणि माणुसकीने भरलेले!
प्रशासन म्हणजे फक्त नियमांची अंमलबजावणी नव्हे; तर योग्य वेळी माणुसकीने पुढे येणेही तेवढेच महत्त्वाचे असते. एका अपघातग्रस्त विद्यार्थ्याला दिलेला हा आधार म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या स्वप्नांना दिलेली नवी ताकदच होती.
आजच्या स्पर्धात्मक युगात अशा संवेदनशील अधिकाऱ्यांमुळेच व्यवस्थेवर विश्वास वाढतो.
अपघातग्रस्त विद्यार्थ्याची जिद्द आणि त्याला मिळालेला हा माणुसकीचा आधार…. दोन्हीही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत.
खरंच…
कर्तव्य जर शिस्तीने पार पडले आणि मनात माणुसकी जपली,
तर अधिकारी फक्त पदाने मोठे राहत नाहीत…… ते माणुसकीनेही उंचावतात!

About Belgaum Varta

Check Also

‘मराठी भाषा प्रेरणा मंच’तर्फे मराठी विद्यानिकेतनला महात्मा जोतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित

Spread the love  बेळगाव : सन् 2025-26 मध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सर्व क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *