Monday , March 9 2026
Breaking News

भावाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 30 वर्षांची शिक्षा

Spread the love

 

खानापूर : भावाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस विशेष पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय विठ्ठल बैलूर (वय 36, रा. डोरी, ता. अळनावर, जि. धारवाड) याने स्वतःच्या मोठ्या भावाची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही 2025 मध्ये तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेप्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पीएसआय एम. बी. बिरादार व पीआय एल. एच. गौंडी यांनी केला. त्यांना तपासात सहाय्यक म्हणून सीपीसी-3703 मंजुनाथ मुसळी यांनी मदत केली. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तसेच कोर्ट कामकाजासाठी सीपीसी-3573 प्रविण होंडद यांनी कर्तव्य बजावले.

सदर प्रकरणाची सुनावणी बेळगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयात अवघ्या एक वर्षात पूर्ण झाली. सुनावणीदरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीस 30 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी सरकारतर्फे प्रभावी युक्तिवाद मांडला.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेत ग्रीन बोर्ड आणि तिजोरीचे उद्घाटन

Spread the loveआयडीबीआय बँकेकडून ९० हजारांची देणगी; पालक सभेच्या निमित्ताने कार्यक्रम येळ्ळूर : येथील मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *