Friday , April 10 2026
Breaking News

स्तवनिधीत हेमाडपंथी पाषाण मंदिरामध्ये सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ व स्थवनिधी येथील ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री पार्श्वनाथ ब्रम्हचार्याश्रम गुरुकुलमध्ये चैत्र कृष्ण पंचमीच्या मुहूर्तावर हेमाडपंथी पद्धतीने पाषाण नूतन मंदिर निर्माण होत आहे. दक्षिण भारतामध्ये कर्नाटकाच्या या प्रवेशद्वारावरती, तवंदी डोंगराच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या या मंदिरामध्ये नूतन नयन मनोहर भगवान १००८ सहस्त्रफणी पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती प्रतिष्ठापना भक्तीमय वातावरणात करण्यात आली.
सकाळी सात वाजता मंत्र पठण व वाद्यांसमवेत गोकाक निवासी सुशीला दरगशेट्टी व सर्व कुटुंबाकडून विधीपूर्वक पूजा करण्यात आली. ८ वाजता गुरुकुल परिवार संचालक महावीर पाटील, प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्ये आणि ब्रह्मचारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शांतिनाथ झाले. ११.३० वाजता साडेतीन टन वजनाची ८ फुटी भगवान पार्श्वनाथांची मूर्ती क्रेनच्या सहाय्याने मंदिराच्या गाभाऱ्यात भक्तीमय वातावरणात, संगीताचा गजर आणि जयघोषात विधीपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी बेळगाव येथील जिनबकुल फोर्जचे मालक, धार्मिक, समाजसेवक, शिक्षण प्रेमी गोपाल जिनगौडा यांच्या हस्ते मंदिरच्या शिखराची पूजा पार पडली. संचालक महावीर पाटील यांनी, महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरती कर्नाटकाचे प्रवेशद्वार असलेल्या या ठिकाणी विशेष पद्धतीचे हेमाडपंथी भव्य असे मंदिर उभारत आहे. बाहुबली विद्यापीठांतर्गत असणाऱ्या स्तवनिधी शाखेमध्ये शैक्षणिक कार्य उत्कृष्टरित्या चालत आहे. या नूतन मंदिर व भव्य मूर्तीमुळे निपाणी परिसरातील किंबहुना बेळगाव जिल्ह्यातील स्तवनिधी हे एक प्रेक्षणीय व धार्मिक स्थळ बनणार आहे. मुळातच हे पवित्र आणि अतिशय क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारे ठिकाण आज पुन्हा एक नवीन इतिहास निर्माण करण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले.
मंदिरासाठी दोन कोटी रुपयांची खर्च होणार आहे संचालक आणि देणगीदारांचे सहकार्य लाभत आहे. मंदिरासाठी अनेक श्रावक -श्राविकांनी देणगी जाहीर केली. मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी वेदीवरती अनेकांनी सोने, चांदी देणगी दिली.
कार्यक्रमास बाहुबली विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे, स्तवनिधी येथील संस्थेचे अध्यक्ष जिनरत्न रोटे, उपाध्यक्ष अकोळ येथील गाव कामगार पाटील राजू पाटील, सेक्रेटरी सुनील बल्लोळ, भरत बेडकीहाळे, संतोष चौगुले, अर्चना पाटील, गोपाल जिनगौडा, मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे, एस. एस. तेरदाळ, बी. बी. दादनावर, जे. एस. पाटील, प्रतिका पाटील, अनिल कोथळे, आदिनाथ तिप्पनावर, प्रवीण बनजवाड, धीरज भैय्या, चेतन पाटील, अमर पाटील यांच्यासह शिक्षक, गुरुकुलचे कार्यकर्ते महिला मंडळ, विद्यार्थी आणि संचालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘अंकुरम’ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली

Spread the love  कावळे, चिमण्यांसाठी धान्य, पाण्याची सोय निपाणी (वार्ता) : बदलती जीवनशैली, रासायनिक कीटकनाशकांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *