Monday , August 24 2026
Breaking News

विवेकानंद सौहार्द सोसायटीतर्फे महिला दिन साजरा

Spread the love

 

भगिनी निवेदिता ठेव योजनेचा प्रारंभ

बेळगांव : येथील सहकार क्षेत्रातील ग्राहकांच्या विश्वासास अल्पावधीत पात्र ठरलेल्या विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीतर्फे सोमवारी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सोसायटीतर्फे केवळ महिलांसाठी भगिनी निवेदिता ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालिका नीता कुलकर्णी होत्या.

कर्मचारी सौ. अर्चना दरवंदर यांनी प्रास्ताविक व सेक्रेटरी पद्मा बाडकर यांनी स्वागत केले. यानंतर प्रज्ञा शानभाग, रजनी गुर्जर, सुमन नाडगौडा, धनुजा पाटील, रुपाली हवालदार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
भगिनी निवेदिता ठेव योजना ही महिलांसाठी लाभदायक आहे. या ठेवींतर्गत किमान दहा हजार वा त्याहून अधिक रक्कम ३० महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवता येते, असे यावेळी सांगण्यात आले.

सोनम मंगनाकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालिका, सभासद महिला व हितचिंतक उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीमुळे पीक नुकसानीवर वडगावात शेतकऱ्यांची बुधवारी बैठक

Spread the love  बेळगाव : बेळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *