Tuesday , June 16 2026
Breaking News

सिमाभागातील गिरणी कामगार मुंबईला रवाना

Spread the love

 

बेळगाव : मुंबई गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा सरकारने केली पण त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात सरकार दिरंगाई करत असल्याने श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगार वेळोवेळी आंदोलन करत आहे त्याच प्रमाणे यावेळी सुध्दा श्रमिक संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आझाद मैदानावर १० आंदोलन गिरणी कामगारांनी मोठा संख्येने सहभागी व्हावे यासाठी ७ मार्च रोजी बेळगाव येथील बोडकेनहट्टी येथे जागृती बैठक घेण्यात आली होती.

आज सिमाभागातील चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर तसेच चंदगड तालुक्यातील कुर्णी, गुजवडे, कोवाड, सतेवाडी, अडकूर आदी गावातील गिरणी कामगार रवाना झाले आहेत. यावेळी मनोहर हुंदरे, शिवाजी हुंदरे, दरशथ घाटगे, संजीव कुमार, अतुल दिघे, आदि केदारी पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

दोन कोटींच्या विमा रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या; पत्नीसह ९ जण अटकेत

Spread the love  बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापोटी निवृत्त सैनिकाची कट रचून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *