Thursday , April 30 2026
Breaking News

आप्पाचीवाडी येथील पूल निर्मितीसाठीच ‘रयत’चा तहसील कार्यालयावर चाबूक मोर्चा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत. पुलाच्या कामाचे अनेकदा उद्घाटन झाले. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम रखडल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केला.
रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून तहसीलदार मुंजे यांना निवेदन दिले. त्यावेळी पोवार बोलत होते.
पोवार म्हणाले, पुलाच्या कामाचे प्रस्ताव पाठवले असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या प्रश्नामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. किमान ५० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला सुसज्ज पूल येथे उभारणे आवश्यक आहे. या पुलामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस तसेच इतर पिकांची वाहतूक करणे सोपे होणार आहे. आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवस्थान हे जागृत स्वरूपाचे असल्याने येथे कर्नाटक महाराष्ट्र आणि इतर राज्यातून भाविक येत असतात. या सर्वांच्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत पुलाच्या काम सुरु न झाल्यास निपाणी येथील सिंचन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पवार यांनी दिला.
यावेळी रयत संघटनेच्या माध्यमातून दुचाकी रॅली काढण्यात आली. निवेदन स्वीकारून तहसीलदार मुंजे यांनी सिंचन विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांनी जागेची पाहणी करून हा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बाबासो पाटील, अशोक क्षीरसागर, आनंदा गायकवाड, सागर पाटील, सदाशिव पाटील, ईश्वरा कुंभार, किसन पोटले, सचिन पटेकर, बाबूराव कुरणे, सूर्याजी पोटले, बाबूराव खोत, दिपक सुतार, भास्कर माने, बी आर माने, विश्वास आबणे, श्रीपती माने, विशाल गवंडी, आशिष करे, नितीन कानडे, शिवाजी वाडेकर, अक्षय पाटील, पिंटू शेळके, सचिन पटेकर, संतोष संकपाळ, दादासाहेब मगदूम, दादासो चौगुले, गजानन पटेकर, दिलीप पवार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मॉन्सूनपूर्व खरीपाच्या कामांना वेग

Spread the love  मृग नक्षत्र ४० दिवसांवर; अक्षय तृतीया पासून लगबग निपाणी (वार्ता) : अक्षय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *