
बेळगाव : दख्खनच्या राजा जोतिबा देवाची बेळगांवची मानाची इरप्पा देवदादा सासनकाठी वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाली. चव्हाट गल्लीतील देवघरातील देवाची विधिवत पूजा करून दीडशेहून अधिक नागरिक मानाच्या कटल्यासह बैलगाड्यामधुन कोल्हापूर येथील जोतिबा चैत्र यात्रेसाठी रवाना झाले.
यावेळी बेळगाव (चव्हाट गल्ली, देवदादा सासनकाठी) येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न शहरातील चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवघरामध्ये आज सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले.
कोरोना महामारी संपावी आणि अशी वेळ पुन्हा जगावर येऊ नये यासाठी यावेळी देवाला साकडे घालण्यात आले. यावेळी देवघरातील वारसदार शांताबाई इरप्पा धुराजी यांच्या मार्गदर्शनाखाली पुजारी लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
यावेळी उत्तरचे आमदार श्री. अनिल बेनके यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी गल्लीतील भक्त नागेश नाईक. जोतिबा (सोन्या) किल्लेकर, नामदेव नाईक. श्रीनाथ पवार, राहुल जाधव, जोतिबा धामणेकर, सागर मुतगेकर, पिंटु मरवे, पंकज किल्लेकर, प्रभाकर जाधव, बाजीराव पवार, अभिजित आपटेकर, शुभम तुडयेकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta