Wednesday , March 11 2026
Breaking News

शहापूर येथे हिंदू- मुस्लिम बांधवांकडून इफ्तार कुट एकत्रित साजरा

Spread the love

 

बेळगाव : नवी गल्ली शहापूर येथील हिंदू-मुस्लिम बांधव गेल्या अनेक वर्षापासून सर्व सण गुण्यागोविंदाने एकत्र साजरे करतात. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इफ्तार कुट हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकत्रित साजरा करून सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. नवी गल्ली येथील जामिया मशीदीत नवी गल्ली यंग कमिटी आणि पंच कमिटी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत इफ्तार कार्यक्रमात सहभाग घेत समाजासमोर एकात्मतेचा संदेश ठेवला. नवी गल्ली भागात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम समाज एकमेकांचे सण गुण्यागोविंदाने साजरे करतात. दोन्ही समाजाचे लोक एकमेकांच्या सणांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. आज देखील या समाज बांधवांनी आपली परंपरा जोपासली आहे.
दरवर्षी इफ्तार कुटमध्ये हिंदू बांधव तर गणेशोत्सवात मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत समाजासाठी नवा आदर्श ठरत असल्याची भावना समाजातील ज्येष्ठ लोकांनी व्यक्त केली. या इफ्तार सोहळ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि दोन्ही धर्मांचे ज्येष्ठ पंच कोणताही भेदभाव न ठेवता एकमेकांच्या सणात सहभागी होऊन सामाजिक सलोखा जपतात. यावर्षी देखील रमजाननिमित्त नवी गल्लीतील जामिया मशिदीच्या वतीने इफ्तारच्या माध्यमातून जातीय सलोखा जपला आहे. शहापूर येथील नवी गल्ली यंग कमिटी आणि पंच कमिटी तसेच जामिया मशीद यांच्यातर्फे आयोजित केलेल्या इफ्तार कुट कार्यक्रमात शहापूरचे सीपीआय सीमानी, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, नामनिर्देशित नगरसेवक रमेश सोनटक्के, समिती नेते महादेव पाटील, सतीश पाटील, प्रभाकर अष्टेकर, किरण हुद्दार यांच्यासह मुस्लिम समाजाचे अमजद मोमीन, अब्दुल बागलकोटी, सादिक कोतवाल, झाकीर कणबर्गी, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन साजरा

Spread the love  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *