Wednesday , March 11 2026
Breaking News

अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणी पोक्सोअंतर्गत दोन नराधमांना कारावासाची शिक्षा

Spread the love

 

बेळगाव : अल्पवयीन मुलींची छेडछाड करून अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात बेळगाव जिल्हा विशेष पॉक्सो न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या दोन्ही खटल्यांमध्ये आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाले असून त्यांना कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहिल्या प्रकरणात सचिन अप्पय्या नाईक याला अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी ३ वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात पीएसआय मंजुनाथ हुलकुंद यांनी गुन्हा नोंदवला होता, तर पीएसआय रवी वड्डर यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी पुराव्यांच्या आधारे सचिन नाईक याला दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. तसेच पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून १ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश सी. एम. पुष्पलता यांनी दिले आहेत.

दुसऱ्या प्रकरणात ईरप्पा ईरप्पा धनाकार याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सीपीआय सुरेश पी. शिंगी यांनी केला होता.

न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी साक्षीदार आणि कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे ईरप्पा धनाकार याला दोषी ठरवून ही कठोर शिक्षा सुनावली. न्यायालयाने पीडित मुलीला ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असून ही रक्कम ५ वर्षांसाठी बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. या दोन्ही प्रकरणांत सरकारतर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला.

About Belgaum Varta

Check Also

सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन साजरा

Spread the love  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *