Wednesday , March 11 2026
Breaking News

बेळगावमधील सुरण्णवर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट सर्जरी यशस्वी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील सुरण्णवर हॉस्पिटलने अस्थिरोग उपचार क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या राबवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत डॉ. जगदीश सुरण्णवर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली असल्याची माहिती डॉ. जगदीश सुरण्णवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत या रुग्णालयात २०० रुग्णांवर रोबोटिक शस्त्रक्रिया, तर एकूण ३,५०० सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेचा खर्च आणि वेदना दोन्ही कमी होतात, त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जगदीश सुरण्णवर यांनी केले. उत्तर कर्नाटकातील रुग्णांना आता अशा प्रगत उपचारांसाठी मुंबई किंवा बेंगळुरू सारख्या मेट्रो शहरांकडे जाण्याची गरज उरलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, सुरण्णवर हॉस्पिटलने बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत परदेशातील अस्थिरोग तज्ज्ञ बेळगावात येऊन सांधेरोपण आणि ट्रॉमा शस्त्रक्रियेचे प्रगत तंत्र शिकत आहेत. युरोपमधील रोमानिया येथील डॉ. डॅगोस मिरोसू हे पहिले फेलो म्हणून येथे प्रशिक्षण घेत आहेत. भारतीय डॉक्टर प्रशिक्षणासाठी युरोपला जातात, मात्र युरोपचे डॉक्टर बेळगावात येऊन शिकत असणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे डॉ. जगदीश सुरण्णवर यांनी सांगितले.रुग्णसेवेप्रती असलेल्या वचनबद्धतेतून रुग्णालयाने अनेक गुंतागुंतीच्या अस्थि शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. यातील अनेक शस्त्रक्रिया उत्तर कर्नाटकात पहिल्यांदाच पार पडल्या असून, रुग्णालयाने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. सुमित पाटील, डॉ. जाफर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन साजरा

Spread the love  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथे जागतिक महिला दिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *