बेळगाव : या पत्रकाद्वारे कळविण्यात येतं आहे की, कृतीशील मराठा समाजाची बैठक मंगळवारी दिनांक 17 मार्च 2026 रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता बोलविण्यात आली आहे. मराठा समाजा समोरील विविध आव्हाने आणि मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी मराठा संस्थेत उपलब्ध होण्याऱ्या संधी हे बैठकीचे प्रामुख्याने विषय असतील असे समन्वयक अमित देसाई यांनी कळविले आहे. या बैठकीला समाजातील जुन्या जाणत्या, तरुण होतकरू मंडळींनी उपस्थिती दर्शवून आपले विचार मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta