Monday , August 31 2026
Breaking News

प्रा. प्रतिभा मुदलियार यांना ‘इंडिया नेटबुक्स साहित्य भूषण सन्मान’

Spread the love

 

बेळगाव : अनुवाद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बेळगाव येथील साहित्यिक प्रा. प्रतिभा मुदलियार यांना ‘इंडिया नेटबुक्स साहित्य भूषण सन्मान’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान शनिवार १४ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित ‘साहित्यकार सन्मान उत्सव २०२६’ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
बीपीए फाउंडेशन आणि इंडिया नेटबुक्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात देशभरातील विविध साहित्यिकांना त्यांच्या साहित्यसेवेसाठी गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील हॉटेल क्राउन प्लाझा, मयूर विहार फेज-१ येथे झालेल्या या सोहळ्यात प्रा. प्रतिभा मुदलियार यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. प्रतिभा मुदलियार यांनी कविता, साहित्य लेखन तसेच अनुवाद क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवकांना संघटित करून गावाच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व म्हणजे कै. अशोकराव मोदगेकर : श्री. वसंत पाटील

Spread the love  निलजी : रणझुंझार परिवार व कै. अशोकराव मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे समाजाच्या प्रगतीसाठी तळमळीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *