Monday , August 31 2026
Breaking News

महात्मा गांधी सामाजिक संस्थेचे उपक्रम मुंबई आकाशवाणी केंद्रावर…

Spread the love

 

कावळेवाडी… राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवित असून, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या कलागुणांना वाव देऊन प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थीदशेतच वाचनाची आवड निर्माण व्हावी विविध स्पर्धा आयोजित करून व्यक्त होण्यासाठी कौतुकाची थाप देऊन गौरविण्यात येते. या विधायक उपक्रमाची माहिती इतरांना मिळावी या उद्देशाने संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक यांची मुलाखत वासंती काळे यांनी घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
ही मुलाखत 15 मार्चला सकाळी 7.25 मुंबई आकाशवाणी केंद्रावर मराठी अस्मिता या कार्यक्रमात प्रसारित करण्यात येणार आहे. राज्य मराठी विकास संस्था मुंबईकडून अनुदान मिळते खास आभार मुलाखतीतून वाय. पी. नाईक यांनी व्यक्त केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

खेळ विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि सांघिक भावना निर्माण करतो : किरण जाधव

Spread the love  बेळगाव : विद्या भारती कर्नाटक – बेळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *