Wednesday , March 18 2026
Breaking News

बेळगाव महापौर पदी प्रीती कामकर तर उपमहापौर पदी हनुमंत कोंगाळी यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेवर भाजपने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत जातीच्या समीकरणाचा आधार घेत बेळगाव शहराचा प्रथम नागरिक बनण्याचा मान विणकर समाजाला देण्यात आला असून त्याप्रमाणे महापौर पदी प्रीती कामकर निवड करण्यात आली तर उपमहापौरपदी लिंगायत समाजाच्या हनुमंत कोंगाळी यांची वर्णी लागली आहे.

महापौर निवडीसाठी भाजप आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागाला महापौर पद तर उत्तर विभागाला उपमहापौर पद देत समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे उदिष्ट समोर ठेवून आमदार अभय पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी जातीय समीकरण जुळवून आणले आहे. भाजपच्या 38 सदस्यांचे संख्याबळ असल्याने महानगरपालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. 58 सदस्य असलेल्या महानगरपालिकेकडे स्पष्ट बहुमत आहे. आज दुपारी हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली असून आगामी विधानसभा तसेच व्होट बँक लक्षात घेत सामाजिक न्यायाच्या नावाखाली भाजप नेत्यांनी ही निवड प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे समजते.

काँग्रेसकडून महापौरपदासाठी खर्शीद मुल्ला आणि उपमहापौरपदासाठी मोदिनसाब मतवाले यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

निवडीनंतर महानगरपालिकेत भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

बेनाडीत क्लुझर मोटारीने धडक दिल्याने आटपाडीतील दुचाकीस्वार गंभीर जखमी

Spread the love  निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या क्लुझर मोटारीने पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *