Monday , September 21 2026
Breaking News

योग्य लाभार्थ्यांनाच घरकुलांचा लाभ मिळावा

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; नगरपालिका आयुक्तांना निवेदन

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील गरीब,‌ गरज कुटुंबीयांना १८११ घरकुल मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतलेल्या लाभार्थी ऐवजी खरोखरच गरजू असलेल्या लाभार्थींची यादी तयार करून त्याबाबत वृत्तपत्रात प्रकरण जाहीर करण्यासह नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर संबंधित लाभार्थींची नावे आणि पत्ता दिल्यानंतरच ही यादी अंतिम करावी, अशी मागणी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केली. बुधवारी (ता.१) सकाळी नगरपालिका येथील बैठकीत ते बोलत होते. बैठकीनंतर याबाबतची निवेदन नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना देण्यात आले.
चिंगळे म्हणाले, घरकुल लाभार्थी यादी बाबत गोंधळ निर्माण झाला असून त्यामध्ये पारदर्शकपणा असायला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे कामकाज पार पडले पाहिजे. एससी एसटी लाभार्थी आणि सर्वसामान्य लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी मंजूर झाला आहे. सर्व लाभार्थ्यांची योग्य ती चौकशी करून सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करूनच अंतिम यादी तयार केली पाहिजे. शिवाय घरकुल प्रकरणाचे काम पालकमंत्री सतीश जारकी होईल, खासदार प्रियंक जारकी जाहोळी यांचच्आ प्रमुख उपस्थित झाले पाहिजे.
आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी चारही हप्ते भरूनही त्यांची नावे घरकुल यादीत नाहीत. त्याचीही चौकशी त्यांच्यासह उर्वरित हप्ते भरणाऱ्यांना पंधरा दिवसाची मुदत द्यावी. विशेष करून श्रीमंतांना ही घरे घेण्याऐवजी गरजूंना मिळावीत अशी अपेक्षा चिंगळे यांनी व्यक्त केली.
नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी निवेदन स्वीकारून एक माहिती घेतल्याशिवाय घरकुलांचे वितरण होणार नाही याची दक्षता घेण्याची ग्वाही दिली. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, सुजय पाटील, प्रतीक शहा, किरण कोकरे, गजेंद्र पोळ, झाकीर कादरी, अमोल बन्ने, रवी श्रीखंडे, ॲड. संजय चव्हाण, किरण पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *