Monday , September 21 2026
Breaking News

बेनाडीत क्लुझर मोटारीने धडक दिल्याने आटपाडीतील दुचाकीस्वार गंभीर जखमी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या क्लुझर मोटारीने पुढे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बेनाडी येथील मल्लिकार्जुन नगर बस स्टॉप समोर घडली. या अपघातात शत्रुघ्न गवळी (वय ३० रा. आटपाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्रथमोउपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी निपाणी येथे दाखल करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सांगोला येथील भाविक क्लुझर मोटारीने आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी आटपाडी येथील गवळी हे आपल्या दुचाकी वरून (क्रमांक एम.एच.१० -७३०६) कुटुंबा समवेत बेनाडीहून निपाणी कडे जात जात होते. त्याचवेळी सांगोला येथील भाविक चार चाकी वाहनाने (क्रमांक एम.एच.०९ डी एक्स -९८८३) निपाणीकडे निघाले होते. त्यावेळी चार चाकी वाहनाने दुचाकी ला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. यावेळी मल्लिकार्जुन नगर मधील रहिवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. त्यानंतर उपचारासाठी जखमीला उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटने बाबत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *