Sunday , September 20 2026
Breaking News

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सीमाभागातील लढवय्ये नेते दीपक दळवी अनंतात विलीन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सीमा लढवय्ये दीपक दळवी यांच्यावर काल संध्याकाळी बेळगावमधील शहापूर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हजारो चाहते आणि मराठी भाषिकांच्या उपस्थितीत दळवी पंचतत्वात विलीन झाले. काल संध्याकाळी शहापूर येथे दीपक दळवी यांची अंत्ययात्रा अत्यंत जड अंतःकरणाने काढण्यात आली. सार्वजनिक दर्शनानंतर निघालेल्या या मिरवणुकीत हजारो महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि चाहते सहभागी झाले होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांनी “अमर रहे, अमर रहे, दीपक दळवी अमर रहे”च्या घोषणा देत निरोप दिला.

शहापूर स्मशानभूमीत मराठा परंपरेनुसार विधी पार पाडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, सीमा लढ्यातील कार्यकर्ते आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दळवी यांच्या निधनामुळे बेळगावच्या मराठी राजकारणातील एक संघर्षशील अध्याय संपुष्टात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *