
बेळगाव : बेळगाव शहराला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे संगीत कला साहित्य व मनोरंजनाच्या क्षेत्रात बेळगावच्या कलाकारांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या युवा पिढीला देखील आपल्या समृद्ध वारशाचे भान आहे. बेळगावकरांना कलेची उत्तम जाण आहे आणि यातूनच प्रोत्साहन मिळते. सर्व वयाच्या लोकांना एकत्र मिळून बेळगावचा हा सांस्कृतिक वारसा आणखी विकसित करण्याचं करण्यासाठी प्रयत्न करणारी रोष्ट्रम डायरीज ही संस्था होय.
पेशाने अभियंता असलेल्या अभिषेक भेंडीगेरी अवलिया माणसाने रोष्ट्रम डायरीजची संकल्पना आणली. बेळगाव शहरातील उभरत्या युवा कवी कथाकार गायक आणि अभिनेत्यांना एकाच मंचावर आणण्याचे ध्येय होते या कामात प्रसिद्ध डॉक्टर माधव प्रभू, लेखिका स्वाती जोग यांची त्यांना साथ मिळाली. पुढे या मांदियाळीत शिक्षण तज्ञ आशुतोष डेव्हिड आणि विनोद दोड्डण्णावर, सीए पुष्कर ओगले, कवयत्री मीरा राघवन असे अनेक साहित्यप्रेमी जोडले गेले. गेल्या पाच वर्षात रोष्ट्रम डायरीजने 20 हून अधिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ज्यात एक हजारहून अधिक कलाकारांनी आपली कविता कला सादर केली आहे. यात इंग्रजी हिंदी कन्नड मराठी भाषेत सादरीकरण करण्यात येते. डायरीजला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादनंतर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्याचे ठरविण्यात आले 2019 साली पहिल्यांदा बेळगाव काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला जगभरातील सुमारे पाच हजार कवींनी यात सहभाग आपल्या कविता पाठवल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात विजेत्यांना बक्षीस देखील देण्यात आली होती. आता दुसऱ्या बेळगाव आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जगभरातील सर्व वयोगटातील ऑनलाईन माध्यमातून इंग्रजी हिंदी, मराठी व कन्नड भाषेतील कविता प्रसिद्ध करण्यासाठी एक संधी या आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनद्वारे मिळत आहे. या कविता खालील पैकी कोणत्याही भाषेतील असायला हव्यात इंग्रजी हिंदी कन्नड किंवा मराठी
ऑनलाइन कविता दाखल करण्यासाठी वयाची अट नाही. जगातील कोणत्या देशातील व्यक्ती यात सहभागी होऊ शकतो. हिंदी इंग्रजी कन्नड मराठी यापैकी कोणत्याही भाषेत कविता दाखल करता येते. या कवितांमधून सर्वोत्तम 200 निवडक कवितांचा या नवीन प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात मोफत प्रकाशित केली जाईल. सर्व कवींना ई- प्रमाणपत्र देण्यात येईल. याचे वितरण अंतिम सोहळा नंतर ई-मेल मार्फत केले जाईल. ऑनलाईन माध्यमातून कविता दाखल करण्यासाठी 22 मे 2022 ही शेवटची तारीख आहे.
विजेत्यांची ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे त्या वेळी निवडक कवीना आमंत्रण देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी 9986186781 या क्रमांकावर संपर्क साधावा
ऑनलाइन कविता दाखल करण्यासाठी www.belgavipoetryfestival.com
या संकेतस्थळाचा वापर करावा.
Belgaum Varta Belgaum Varta