बेळगाव : रयत गल्लीत “एलअँडटी” पाणी पुरवठा करणारे 8/10 दिवसांनी एकदा नळाला पाणी सोडतात. तेही एकदम कमी दाबाने. रोज सोडलं जातं ते गल्लीतील ज्येष्ठांनी 1936 साली काढलेल्या विहिरोचे पाणी फिल्टरद्वारे सोडलं जात. गेल्या महिन्याभरापूर्वी विहिरीच्या पाण्यात ड्रेनेजमिश्रित, दुर्गंधीयुक्त पाणी मिसळत असल्याने ते अत्यंत धोकादायक होते म्हणून बंद केले होते. गल्लीत भरपूर जनावरं असल्याने ते पाणी जनावरं सुध्दा पित नव्हती म्हणून वापर बंद केला. त्यामुळे पाण्याची अत्यंत कमतरता भासत असल्याने पाण्यासाठी गल्लीतील महिलांनी मनपावर धडक घागर मोर्चा नेऊन जाग आणल्याने विहिर स्वच्छ करण्यासाठी ताबडतोब कारवाई सुरु केली. विहिरीतील पाणी संबंधीत खात्याकडे तपासणीसाठी पाठवले. त्यात बरेच घातक जिवाणू दिसल्याने पुन्हा पुन्हा पाणी खाली करुन ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छ झाले की नाही ते तपासण्यासाठी परत पाठवले. आता पाण्याला दुर्गंधी नाही पण थोड्या प्रमाणात रोगजंतू आहेत असं म्हटल्यावर पुन्हा खाली करुन तपासणीसाठी दिले आहे. त्याचा निर्वाळा येणे बाकी आहे. पण पाणी अजूनही दुषित आहे असं दिसतं. त्यासाठी गल्लीत टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पण तो अपूरा पडत असल्याने जनता अत्यंत नाराज आहे. मोर्चा दिवशी मनपा आयुक्त तसेच तेथील उच्च अधिकारी निपाणीकर यांना तिथे पर्यायी व्यवस्था व आधीच गल्लीत असलेल्या बोअरला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे म्हणून ती बंद आहे. आता वरच्या बाजूला दुसरी बोअर मारुन त्यावर टाकी बसवून सोय तात्काळ व्यवस्था करावी म्हणून सांगितलं होत. त्याबद्दल विचार सुरु आहेत असं कळतं. पण अजूनपर्यंत बोअरचे काम हाती घेतलेले नाही. त्यासाठी पाण्याची कमतरता त्यात दुर्भिक्ष पहाता तात्काळ नवीन बोअर मारुन टाकी बसवून गल्लीत पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा आधिपेक्षाही मोठा महिलांचा घागर मोर्चा मनपावर कधी धडकेल. त्यावेळी मात्र काय घडेल सांगता येणार नाही. येवढे मात्र नक्की.
Belgaum Varta Belgaum Varta