Sunday , September 20 2026
Breaking News

भोंदू अशोक खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी ‘अघोरी’ विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

Spread the love

 

नाशिक : नाशिकचा भामटा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याचे कुख्यात कारनामे एकामागून एक समोर येत आहे. अनेक महिला त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत. त्यांचे 300 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहे. शोषणाच्या या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकारण्यांसोबत मिळून त्याने क्राइम सिंडिकेट चालवल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. राज्यातील बड्या नेत्यांचा तो महागुरू असल्याचे एव्हाना विविध पूजेवरून समोर आले आहे. सार्वजनिक रित्या अनेक जण आता आपण त्याचे चेले नसल्याची कबुली देत असले तरी त्यांचे फोटो बरेच काही सांगून जाते. या भोंदूबाबाने थेट निवडणुकीत जिंकून देण्यासाठी तोटका वापरल्याचे आणि पूजा बांधल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी आता विशेष तपास पथकाच्या रडारवर अनेक गोष्टी आल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर येत आहे. एक महिला नेत्या भोंदू अशोक खरातकडे ‘तोटका’ करण्यासाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. धक्कादायक निकाल लावून देतो म्हणत अशोक खरात याने या महिला नेत्याला पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वीही या भामट्याने अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे प्रकरण समोर येताच एसआययटीकडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीत यशासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातच्या कार्यालयात संबंधित नेत्या आणि कुटुंब वारंवार येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. याविषयीचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. आता खरातच्या खेटा करणाऱ्या या धुरंधर नेत्यांची पण वरात निघणार का, असा सवाल जनतेतून विचारल्या जात आहे. राजकीय पाठबळामुळेच खरातची महिलांच्या इभ्रतीवर बिनधास्त हात टाकण्याची हिंमत झाल्याचा आरोप जनतेतून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *