बेळगाव : बेळगावातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्री यात्रेनिमित्त ज्योतिबाची रांगोळी रेखाटली आहे. सदर रांगोळी दोन फूट बाय तीन फूट आकाराची आहे. ही रांगोळी रेखाटण्यासाठी चौदा तास इतका वेळ लागला आहे. ही रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर केला आहे. यापूर्वी देखील विठ्ठल रखुमाई, श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज, राम मंदिर तसेच अनेक दिग्गज व्यक्तिमत्वच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत. सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ, वडगाव येथे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येईल.
Belgaum Varta Belgaum Varta