Monday , May 25 2026
Breaking News

यशासाठी धैर्य आणि वक्तशीरपणा महत्त्वाचा

Spread the love

 

 

किरण कमते : बागेवाडी महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय ठेवून नियमित अभ्यासासह कठोर परिश्रम करणे महत्त्वाचे आहे. सहजासहजी यश मिळत नसून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न वक्तशीरपणा आणि धैर्याची आवश्यकता आहे, असे असे मत २०२५ मध्ये होणाऱ्या भारताच्या सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेत ५३ वा क्रमांक मिळवलेल्या किरण कमते यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील के.एल.ई. संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी (ता.३१ मार्च) आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रवीण बागेवडी तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक मंडळाचे अध्यक्ष महेश बागेवाडी, सदस्य एम. आर. पाटील उपस्थित होते.
कमते यांनी, अपयशाला घाबरू नये, ते एक आव्हान म्हणून स्वीकारून पुढे जावे. ज्ञानस्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास निश्चितपणे यश मिळत असल्याचे सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात सखोल अभ्यास करण्याचा सल्ला दिला. प्राचार्य, डॉ. एम. एम. हुरळी यांनी, समाजाच्या विकासात विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल व विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करण्याची वृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास निवृत्त प्रा. डॉ. बी. एस. कांबळे, डॉ. आर. जी. खराबे, प्रा. विजय धारवाड, डॉ. एस. एम. रायमाने डॉ. अतुलकुमार कांबळे, डॉ. अशोक राठोड, नागराज बेळगावकर, डॉ. आनंद केंचक्कनवर, डॉ. एम. डी. गुरव, प्रा. मंजुळा के, प्रा. टी. व्ही. नंदी, डॉ. बी. एम. जनगौडा, डॉ. सतीश नायक, आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. शंकरमूर्ती के. एन. यांनी स्वागत केले. निवृत्त प्राचार्य डॉ. एम. बी. कोठीवाले यांनी प्रास्ताविक केले. आर. मोनिका आणि पूजा खानाप्पागोळ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य हेमा चिक्कमठ यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *