Monday , September 21 2026
Breaking News

महावीरांच्या जन्मकल्याण महोत्सवात वरघोडा मिरवणुकीचे आकर्षण

Spread the love

 

साध्वीजीश्री लब्धीवर्धनाश्रीजींची उपस्थिती; शहरातील विविध मार्गावरून भव्य मिरवणूक

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील जैन समाजातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी (ता. ३१) भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने साध्वीजीश्री लब्धीवर्धनाश्रीजींची यांच्या पावन उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळपासूनच भगवान महावीरांच्या उद्घोषानांनी निपाणी नगरी दुमदुमून गेली होती. वर घोडा मिरवणूक या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
सकाळी सात वाजता चंद्रप्रभू भगवान आणि भोगतान सवाल झाले. त्यानंतर श्राविकांनी पाळणा सादर करून जन्म कल्याणक सोहळा साजरा केला. सकाळी ९.१५ वाजता महावीर भगवान जन्म कल्याणात वर घोडा मिरवणुकीला मंदिरापासून प्रारंभ झाला. त्यानंतर रास कांचन कार्यक्रम पार पडला. फोटो वाले कॉर्नर, कित्तूर चन्नम्मा चौक, रविवार पेठसह विविध मार्गावरून मिरवणूक काढून पुन्हा चंद्रपूर मंदिरात मिरवणूक आली. त्यामध्ये भगवान पार्श्वनाथांची मूर्ती ठेवण्यात आली होती. ठिकठिकाणी मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील पुरुषांनी केशरी धोती व दुपट्टा असा पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग घेतला होता. तर महिलांनी गुलाबी साड्यांमधून
एकसंधता दर्शविली. हातात १०८ ध्वज घेतलेल्या श्रावक -श्राविकामुळे मिरवणुकीला विशेष शोभा आली. सहभागी भाविक शिस्तबद्ध रांगेत चालत धर्मप्रभावना करत होते. मिरवणुकीतील ‘वीररथ ‘मध्ये भगवान महावीरांची आकर्षक मूर्ती विराजमान करण्यात आली होती. जैन सोशल ग्रुप तर्फे आहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष कांतीभाई शाह, उपाध्यक्ष सतीशभाई शाह, अरविंदभाई शाह यांच्यासह ट्रस्टीनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *