
बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव या शाळेला, जिल्हास्तरीय आदर्श शाळेचा पुरस्कार प्राप्त झाला. मुलींच्या शिक्षणासाठी शाळेने दिलेले योगदान, आणि समाजातील शाळेचा नावलौकिक, उच्चतम प्रगतीचा चढता आलेख, शिक्षक वृंदाचे अभूतपूर्व योगदान. तसेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतीचा वापर याचमुळे या शाळेने समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचीच दखल घेऊन जिल्हा पातळीवरील आदर्श शाळा म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. नितीन बेनके आणि त्यांच्या शिक्षक वृंदांचा कुमार गंधर्व रंगमंदिर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दि. 29 मार्च 2026 रोजी, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती लता मुळ्ळूर, डीडीपीआय श्रीमती लीलावती हिरेमठ, बेळगाव शहराचे शिक्षणाधिकारी श्री. रवी बजंत्री, ग्रामीण क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. अंजनेय सर, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta