Monday , September 21 2026
Breaking News

शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये ‘मार्च एन्ड’ची लगीन घाई

Spread the love

 

दिवसभर व्यवहार सुरूच; दुपारनंतर निवळली गर्दी

निपाणी (वार्ता) : ‘मार्च एंडिंग’मुळे शहर आणि परिसरातील आर्थिक वर्ष अखेरची लगबग मंगळवारी (ता.३१) दिवसभर दिसून आली. त्यानिमित्ताने शासकीय कार्यालयात बिले मंजुरी, बँका, पतसंस्था आणि कृषी पतीन बँकेत कर्ज व्याज भरण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढली होती. काही बँका तर रात्री उशिरापर्यंत उघड्या दिसत होत्या.
आर्थिक वर्ष अखेरीमुळे सुट्टीच्या दिवशी रविवारीही शासकीय कार्यालये आणि काही बँका सुरु होत्या. मंगळवारी (ता.३१) मार्चचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच शासकीय कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली होती. बँका सुरू असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच बँकांमध्ये दुपारपर्यंत पैसे काढणे आणि भरणे अशी दोन्ही कामे सुरू होती. त्यामुळे झालेली गर्दी तीन नंतर कमी होत गेली. काही ठिकाणी दुपारी जेवणासाठी ही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ मिळाला नव्हता.
नगरपालिका व इतर शासकीय कार्यालयात कामांची बिले मंजुरीसाठी धावपळ उडाली होती. सर्वच विभागांची अकाउंट ऑफिसमध्ये कामाची गर्दी होती. “मार्च एंड”मुळे आठवड्यापासूनच आर्थिक संस्थातील अधिकारी व कर्मचारी कर्ज आणि व्याजांच्या वसुलीसाठी कर्जदारांच्या कार्यालयासह घराकडे चकरा मारत होते. अखेर कर्जदारांनीही आर्थिक वर्षाखेरच्या दिवशी खटाटोप करून कर्ज व्याज भरून रिकामे झाले. तर काहींनी बॉंड करून कर्जाचे रेन्यूएशन आणि मॉर्गेज करून डोक्यावरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत सर्वच शासकीय कार्यालय आणि बँकांमध्ये मार्च अखेरची धावपळ दिसत होती.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *