Sunday , April 5 2026
Breaking News

जीवन विवेक प्रतिष्ठानच्या वतीने ‘अभ्यास व कृती केंद्रा’ची सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी काळी आमराई, बेळगाव या ठिकाणी जीवन विवेक प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गटातील मुलांसाठी अभ्यास व कृती केंद्र सुरू करण्यात आले आहे. जीवन विवेक प्रतिष्ठान ही दिवंगत कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ते ऍड. राम आपटे यांनी स्वतःच्या आयुष्यभराच्या मिळकतीतून स्थापन केलेली विश्वस्त संस्था आहे. जानेवारी २६ पासून रामदेव गल्ली येथील नवीन कार्यालयातून या संस्थेचे कार्य सुरू झाले आहे. याआधी सुप्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे, पुणे यांच्याशी संवाद कार्यक्रम, सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सर्वधर्मीय व समग्र महिला समूहाला सामावून घेणारा तिळगुळ समारंभ, एकल महिला मैत्री व सहसंवाद कार्यक्रम असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. १ एप्रिल पासून सुरू झालेला अभ्यास व कृती केंद्राचा उपक्रम नियमितपणे शालेय गटातील मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सुरू केलेला आहे. वस्तीतील लोकांचा आणि मुलांचा उत्साहवर्धक सहभाग या कामाला लाभत आहे असे कार्यक्रमाच्या संयोजक अमिता नायगावकर व संस्थेच्या सचिव नीला आपटे यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *